वडगाव मावळ येथे भाजपाचा निषेध मोर्चा

ps logo rgb

……
आमदार सुनिल शेळके यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
…………
आमदार शेळके यांची हुकूमशाही नेस्तनाबूत करू: मावळ भाजपचा इशारा

वडगाव मावळ : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल ‘हरामी’ असा असभ्य शब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वडगाव मावळ येथे भाजपा मावळ तालुक्याच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

पोटोबा महाराज मंदिर, वडगाव मावळ येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व माजी राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे, गणेशतात्या भेगडे आणि शांतारामबापू कदम, गुलाबकाका म्हाळसकर, रणजित काकडे, इत्यादी यांनी केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी “कार्यकर्त्याच्या सन्मान में, भाजपा मैदान में” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि संघटनेचा स्वाभिमान जपण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजप हा केवळ पक्ष नाही तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे असलेले संघटन आहे. कार्यकर्त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा शब्दात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

या मोर्चामध्ये भाजपा मावळ तालुक्यातील सर्व मंडलांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. . तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रवी भेगडे, रणजीत काकडे, कैलास पानसरे, अभिमन्यू शिंदे, किरण भिलारे, सायली बोत्रे, सुरेखा जाधव, रघुवीर शेलार यांनी भाषणे केली. उपसभापती शांताराम कदम यांनी प्रास्ताविक केले.

बाळा भेगडे म्हणाले,’ राज्यात आमचे सरकार आहे, आमच्या छत्र छायेत राहून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका. वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागा, अन्यथा मावळच्या रस्त्यावर फिरू देणार नाही.

रणजित काकडे म्हणाले, भाजपा संपवणे, कार्यकर्ते संपवणे, विरोधकांच्या व्यवसायात अडथळे आणणे, स्वतःचा स्वार्थ पाहणे, रिंग रोड मध्ये टक्केवारी करणे यापलीकडे आमदार शेळके यांनी काहीच काम केले नाही. एका बाजूला पावसाअभावी तालुक्यातील भात शेती मरत आहे आणि हे महोदय भाजपा कार्यकर्त्यांना शिव्या देत आहेत. तालुक्याची सामाजिक परिस्थितीती खराब करायचे काम आमदारानी केले आहे.

आमदारांना हुकुमशाह सुनील शेळके प्रा. लि. असे संबोधून टीका करण्यात आली. भाजपा हा संस्कारी पक्ष आहे आमच्यातून संस्कार रूपी टक्केवारी घ्या असेही या वेळी सांगण्यात आले.

भाजपा पवन मावळ मंडलाचे अध्यक्ष दत्तात्रय जानोबा माळी, लोणावळा-नाणे मावळ मंडलाचे अध्यक्ष अनिल दगडूआबा गायकवाड, देहू-देहूरोड मंडलाचे अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार, वडगाव-कामशेत मंडलाचे अध्यक्ष अभिमन्यू प्रकाश शिंदे आणि तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाचे अध्यक्ष विनायक गंगाराम भेगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

प्रारंभी अभिनेते नाना पाटेकर यांना आणि दिवे आगर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आमदार शेळके स्वतः च्या भ्रष्टाचारावर बोलणार का ?

आमदार सुनील शेळके यांच्या भ्रष्टाचारावर व हुकूमशाहीवर रणजीत काकडे यांच्यासह वक्त्यांनी चौफेर टीका केली .त्यामध्ये विकासकामातील टक्केवारी,एमआयडीसी पासून रिंग रोड पर्यंत आणि पोटोबा मंदिराच्या आरक्षणापासून शैक्षणिक संस्था बंद करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश होता. त्यांना अनेक जाहीर प्रश्न विचारण्यात आले.

  • आमदारांच्या खाणींच्या जागा व बुडालेली रॉयल्टी
  • MIDC च्या चांगल्या जागेची आदली-बदली का केल्या ,
  • बऊर एमआयडीसी मधील स्टॅम्प ड्यूटी का बुडवली ,
  • आमदार सुनिल शेळके स्वतःचा बेकायदेशीर दगड उत्खनन व क्रशर व्यावसाय त्वरित बंद करणार का ? या प्रश्नांचा समावेश होता.
  • ………….

Latest News