महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाड येथे पाणी अधिकार परिषद संपन्न…

ps logo rgb

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 9 ऑक्टोबर रोजी पाणी अधिकार परिषद आयोजित केली होती. परिषदेचे उद्घाटन समन्याय पाणी वाटप चळवळीचे प्रमुख तसेच बहुजन कष्टकर्‍यांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात काही महिलांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप

करून झाले.

  • डॉक्टर भारत पाटणकर यांनी उद्घाटकीय भाषणामध्ये महाराष्ट्रातील धरणग्रस्तांच्या तसेच पाण्याच्या वाटपाच्या अनुषंगाने झालेल्या लढायांचा इतिहास सांगत सद्यस्थितीत पाण्याचे महत्व तसेच सर्वांना पिण्याचे वापराचे,शेतीचे समान पद्धतीने पाण्याचे वाटप झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
  • महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाचे महत्वाचे योगदान असलेले सुरबानाना नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांनी देखील मार्च चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
  • प्रमुख वक्त्या महिला फेडरेशनच्या राज्यसचिव कॉम्रेड लता भिसे यांनी देशभरातील पुरोगामी चळवळींची सद्यस्थितीबद्दल मांडणी करीत असताना आदिवासी समाजातील कातकरी समाजाचे वास्तव अधोरेखित केले. तसेच अजूनही कातकरी समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे त्यांच्यासाठी उपाययोजना कराव्यात असे मनोगत व्यक्त केले.
  • महाड चवदार तळे सत्याग्रहातील प्रमुख संघटक कॉम्रेड आर. बी.मोरे यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सुबोध मोरे हे देखील पाणी अधिकार परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कॉम्रेड सुबोध मोरे यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास सांगत आणखीही त्या संदर्भातलं संशोधन करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. सत्यशोधक बहुजन आघाडीचे प्रमुख सचिन बगाडे हे पाणी अधिकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्व सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे पाणी हा मूलभूत अधिकार असताना देखील या देशात सर्व साधन संपत्तीचे वाटप हे जातीय उतरंडीनुसार झालेले आहे. त्यामुळे अस्पृश्य समाजाला पाण्याला स्पर्श करण्याचा देखील अधिकार नव्हता. प्राचीन कालखंडापासून गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळ्याचा केलेला सत्याग्रह हक्क, आणि अधिकारासाठीचा होता. आज देशातील सरकार सर्व पाण्याचे खाजगीकरण करून भांडवलदारांच्या हातामध्ये सोपवत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणूनच उच्च जात भांडवलदारांचे हित रक्षण करणारे हे सरकार सत्तेवरून खाली खेचावे लागेल व त्यासाठी सर्व शोषित वंचित कष्टकऱ्यांनी एकजूट करावे असे अध्यक्ष भाषणामध्ये मनोगत व्यक्त केले.
    परिषदेचे स्वागताध्यक्ष नागेश गायकवाड तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष निलेश वाघमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
    संघटनेचे कोकण प्रभारी राहुल सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
    यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद पाटोळे प्रा. दिनकर दळवी, सांगली जिल्हाध्यक्ष निलेश मोहिते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गायकवाड संभाजी मस्के संतोष भिसे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख एडवोकेट विजय बनसोडे अभिजीत जाधव गणपत काटेकर बायडाबाई मुकणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रायगड जिल्हाध्यक्ष पिंटू जाधव तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष निकेश कदम यांनी केले.

K. Rajguru.
सत्यशोधक बहुजन आघाडी.

Latest News