कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून ८७.६१ लाख उकळले…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जाधव यांना ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी रुपयांचे बनावट धनादेश दिले. मात्र हे सर्व चेक बँकेत वटले नाहीत. एवढेच नव्हे तर आरोपींनी जाधव यांना वेगवेगळ्या आलिशान कार्यालयांमध्ये नेऊन कर्ज मंजूर झाल्याची बनावट पत्रे दाखवली. त्याद्वारे त्यांची सतत दिशाभूल करण्यात आली. कर्ज मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी पैशांनी भरल्याचे भासवून सहा बॅगा आणि दोन पेट्या त्यांच्या स्वाधीन केल्या.
कोट्यवधी रुपयांचे कर्ज सहज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिक्षण संस्थाचालकाची तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.न वटल्याने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी सहा बॅगा आणि दोन पेट्या देत त्यामध्ये पैसे असल्याचे भासवले. मात्र घरी जाऊन पेट्या उघडल्यानंतर त्यातून विटा, जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी, चादरी आणि उशा निघाल्याने संस्थाचालकाला मोठा धक्का बसला. या प्रकरणी अनुप दिवेकर (४२), आनंद दिवेकर (४४, दोघे रा. निगडी प्राधिकरण)
आणि देशमुख नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सुधाकरराव उद्धवराव जाधव (६५, रा. नऱ्हे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार २५ डिसेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडला. संस्थेच्या विस्तारासाठी सुधाकरराव जाधव यांना मोठ्या कर्जाची गरज होती. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. कर्जाच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम आधी भरावी लागेल, असे आरोपींनी सांगितले.
बॅगा आणि पेट्या वजनाने जड असल्याने त्यामध्ये पैसे असल्याचा जाधव यांचा विश्वास बसला. मात्र घरी गेल्यानंतर पेट्या उघडल्या असता त्यात पैशांऐवजी विटा, जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी, चादरी आणि उशा असल्याचे समोर आले. आपली तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींनी आणखी कोणाची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जाधव, त्यांच्या पत्नी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी ८७ लाख ६१ हजार रुपये आरोपींच्या वैयक्तिक बँक खात्यांवर तसेच ‘आदेश एंटरप्रायजेस’ या खात्यावर जमा केले.
