ई-पासपोर्ट : पासपोर्टमध्ये होणार मोठा बदल, पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चिप असलेले ई-पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस (ISP), येथे हे पासपोर्ट बनवले जातील. ISP ला यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. आयएसपी, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) या प्रणालीवर संयुक्तपणे काम करत आहे. यासाठी आयआयटी कानपूर आणि एनआयसीने एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रकल्पाद्वारे जागतिक स्तरावर सर्व दूतावासांशी जोडले जाणार आहेत. सर्व भारतीयांच्या सेवेसाठी पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन चिप आधारित ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे.

Latest News