पिंपरी त निजामुद्दीन शाहरातून आलेले 23 पैकी 2 करोना बाधित

पिंपरी  (प्रतिनिधी) – दिल्लीच्या निजामद्दीन भागातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये 33 नागरिक आले आहेत. त्यापैकी प्रशासनाने 23 नागरिकांना बुधवारी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून त्यांचे घशातील द्राव एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाढविले होते. दिल्लीवरून आलेल्या त्या 23 संशयितांपैकी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 33 नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी 23 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना वायसीएम व भोसरी येथील नवीन रुग्णालयात दाखल केले आहे.

तसेच त्यांच्या 5 नातेवाईकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरामध्ये करोना विषाणूला रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले होते. मागील बारा दिवसांत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता.

मात्र आता दिल्लीवरून आलेले संशयित पॉझिटिव्ह आडळले आहेत. तसेच त्यातील काहीजण अजूनही बेपत्ता आहे. त्यांना शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान नियंत्रणात आणलेली परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याच्या भीतीने प्रशासनाची झोप उडाली आहे.

Latest News