पिंपरीत गरजूंना मोफत अन्नदान

पिंपरी-चिंचवड विहार सेवा यांचे भोजन व्यवस्थेत मोठे योगदान

“शुद्ध व सकस आहार वाटप”

पिंपरी-चिंचवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.या मुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.या बिकट परिस्थितीत कोणतीही व्यक्ती भुकेली राहू नये, यासाठी शहरातील जैन विहार सेवा वतीने सकस व शुद्ध आहार गरजूंना देण्याची यंत्रणा उभी केली आहे. शरातील एक हजार भुकेल्या व्यक्तींना या कार्यातून पोटभर भोजन देण्याचे कार्य सध्या सुरू आहे. अचानक ओढवलेल्या संकटामुळे शहरातील अनेकांची अडचण झाली आहे. उद्योगनगरीत राज्याच्या विविध काना कोपऱ्यातील कामगार, विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या कठीण प्रसंगी कोणीही उपाशी राहू नये पिंपरी -चिंचवड विहार सेवा यांच्या वतीने सकस आहार् व्यवस्था श्री प्रवीण सोनिगरा संतोष लुंकड बद्रेश भाई शहा मनीष सोनिगरा यांच्या प्रेरणेने करण्यात आली आहे.
यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात गरजूंना दोन वेळचे भोजन देण्यात येत आहे.या साठी वरील संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेची काळजी घेऊन हे कार्यकर्ते मदतीचा हात देत आहेत. भोजन व्यवस्थेसह केळी व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील प्रवीण सोनिगरा मनीष सोनिगरा विवेक धुमावत कपिल मेहता जितेश राठोड यांनी या कार्यासाठी विशेष योगदान दिले आहे.व विहार सेवा ग्रुपच्या सदस्यांकडुन स्वयंस्फुर्तीने करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याने ज्या भागात गरजूंना भोजन हवे आहे त्यांनी प्रवीण सोनिगरा 98 90 13 73 40 या नंबर वर संपर्क साधावा स

Latest News