180 ठिकाणी “पुण्यात नाकाबंदी”

पुणे – झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात देशभरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यातही १८० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या आणि याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत २७२ वाहने जप्त केली आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ३००हुन अधिक जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे

Latest News