दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल : राज ठाकरे

मुंबई : आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. इथून पुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, अशा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आज दिवसभर मनसेच्या मोर्चाने लक्ष वेधले असताना राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल केला. सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.

आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी केंद्राची चूक झाली तेव्हा मी टीका केली. चांगला काम केलं तेव्हा अभिनंदन केलं. मी टीका केली त्यावेळी भाजप विरोधक आणि अभिनंदन केलं तर समर्थक अशा टीका केल्या गेल्या. मधलं काही आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत, तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. ते ड्रग्स विकतात, माता भगिनींची छेड काढतात. या लोकांचा बंदोबस्त करायला हवा, असं ते म्हणाले.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेने महामोर्चा आयोजित केला होता. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघाला. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी आले होते.

Latest News