राज्यात 24 तासांत 25 कोरोना रुग्णचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून ती आता 1364 वर पोहोचली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्या विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला तर 10 पुरुषांचा समावेश आहे. पुण्यातील 14, मुंबईत 9 तर मालेगाव आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा आता 97 वर पोहोचले केली आमदारांची कटिंग प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30766 नमुन्यांपैकी 28865 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 125 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे