लॉकडाऊनमध्ये अडवल्याने दोन तरुणांनी वाहतूक पोलिसांनाचं काठीने औरंगाबादमध्ये मारहाण

Aurangabad

औरंगाबाद: राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. शहराशहरात पोलिस ठिकठिकाणी तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच एक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. लॉकडाऊनमध्ये अडवल्याने दोन तरुणांनी वाहतूक पोलिसांना काठीने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दिल्ली गेटजवळील अण्णाभाऊ साठे चौकात ही संतापजनक घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना नाकाबंदी केली होती. तरी देखील एका दुचाकीवरुन तिघेजण आले. पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. मात्र, थोड्या वेळाने तिघेजण आपल्या इतर मित्रांना घेऊन भाऊ साठे चौकात पोहोचले.

Latest News