देशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता रेल्वेचे तिकिटे रद्द

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे देशव्यापी लॉकडाऊन कालावधी वाढविला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ३ लाख ३८ हजार लोकांनी रेल्वे तिकीट रद्द केले आहे. १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपेल या आशेने २१ लाख १७ हजार प्रवाशांनी रेल्वे तिकिटासाठी आरक्षण केले होते. हे लोक १५ ते ३० एप्रिल दरम्यान रेल्वे प्रवास करणार होते. लॉकडाऊनच्या घोषणेपूर्वीच लोकांना रेल्वे तिकीट आरक्षण करण्यास सुरुवात केली होती. तर १५ मार्च रोजी ३ लाख ८७० लोकांनी आपले रेल्वे तिकीट आरक्षण रद्द केले होते. याचे २३.५४ कोटी रुपये कोटी रुपये रिफंड करण्यात आले होते. तर १६ मार्च रोजी ४ लाख ८७६ लोकांनी तिकीट रद्द केले होते. याचे ४५ कोटी ९८ लाख ४५ हजार ८७६ रुपये रिफंड करण्यात आले होते. त्यानंतर १७ मार्च रोजी ४ लाख ५ हजार लोकांना तिकीट आरक्षण रद्द केले होते. याचे ४६ कोटी ८२ लाख २९ हजार ४२८ रुपये प्रवाशांना परत करण्यात आले होते. जसजसा कोरोना रुग्णांचा आकडा वाढत गेला तसतसा रेल्वे तिकीट आरक्षण रद्द करणाऱ्यांचा आकडा वाढत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनुसार १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होईल या आशेने भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षण सुविधा सुरु केली होती. अनेक राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा उद्याचा (दि.१४) दिवस अखेरचा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.१४) सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी उद्या नवी घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Latest News