सरकारच्या आधीन पुण्यातले सगळे “खासगी डॉक्टर कोरोना रुग्णावर उपचार करावे लागणार…

पुणे प्रतिनिधी : पुण्यातल्या सगळ्या खाजगी डॉक्टरांच्या सेवा आपत्ती नियमन कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहित केल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व खासगी डॉक्टर्सना आता कोरोनाग्रस्तांवर उपचार करावे लागणार आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारकडे असे अधिकार असतात. त्याचाच वापर केला गेला आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले हे गरजे प्रमाणे नियोजन करून सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोनाच्या उपचारासाठी बोलवणार आहेत. सेवा देण्यसाठी या डॉक्टरांना सरकारी मोबदला देण्यात येणार असल्याची ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना हा आकडा 9000 पार गेला आहे आणि मृतांची संख्या 300 हून अधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने नागरिकांमधील चिंता वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सांगितले की, ताब्यात असलेल्या तबलिगी जमातच्या 58 सदस्यांकडून बेपत्ता झालेल्या 40 जणांची माहिती मिळाली आहे आणि त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. 58 जणं गेल्या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मंत्र्यांनी सांगितले की या इस्लामिक संघटनेचे आणखी 18 सदस्य अद्याप बेपत्ता आहेत.

पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. त्यांनी सांगितले की गेल्या आठवड्यापर्यंत या संघटनेतील 58 सदस्य बेपत्ता होते. यापैकी अनेकांनी आपला मोबाइल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे यांना शोधण्यात अडचणी जाणवत होत्या. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी यापैकी 40 जणांना विविध क्लृप्त्या लढवित शोधले आहेत. या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार या सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे.

Latest News