“केंद्र सरकार” अपयशी – आदित्य ठाकरे

मुंबई: करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करत आहेत. मात्र लॉकडाउनचा फटका बसलेला कामगार वर्ग आजही आपल्या राज्यात परत जाण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी संध्याकाळी अशाच पद्धतीने हजारो कामगारांचा मोठा जमाव जमला होता. लॉकाडाउनचा विरोध करत हे कामगार आपल्या गावी जाण्यासाठी हटून बसले होते. गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी हे कामगार करत होते. पोलिसांनी वेळेतच घटनास्थळावर येत सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. मात्र या घटनेवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल केंद्र सरकारला दोषी धरलं आहे. केंद्र सरकार परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य निर्णय घेत नाहीये. या कामगारांना सध्या निवारा आणि अन्नाची गरज नसून त्यांना आपल्या गावाला जायचं आहे, अशा आशायचं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी सरकारला दोषी ठरवलं आहे.

Latest News