पद्मविभूषण – बाबासाहेब पुरंदरें यांना जाहीर


मुंबई: केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 112 पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘पद्मविभूषण’ने गौरव होणार आहे. वयाच्या 97 व्या वर्षी बाबासाहेबांना दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला.
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला, तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला होता. बाबासाहेब हे एक ललित लेखक असून इतिहास संशोधक नसल्याचा दावा केला जात होता.