“पालघर” प्रकरणातील एका आरोपीला कोरोना

पालघर – पालघर हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ माजली आहे. या आरोपीला पालघर ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. त्याला याआधी वाडा पोलिस स्टेशन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे तेथे तैनात पोलिस आणि कोठडीतील आरोपी यांनाही आता विलागिकरण कक्षात ठेवावे लागणार आहे. पालघरमधील गडचिंचले या गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. गावात पसरलेल्या अफवेमुळे ही संतापल्या जमावाने या तिघांनाही मारहाण केली. यामध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी १०० जणांना अटक करण्यात आली असून त्यातील एकाला आता कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आहे.

Latest News