0.4 लॉकडाऊन/राज्यात काय बंद काय चालू

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिवांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत.

*काय राहणार सुरू : दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं, साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. कार्यालयीन ठिकाणी हात धुण्याची सुविधा आणि हँड सॅनिटायझर आवश्यक आहे. औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स, डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील. बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था

*काय राहणार बंद: खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे. तसंच खासगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे, पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि दोन व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल. सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. होम क्वारंटाइन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील. त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यक्तींना सरकारी क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात येईल. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी कायम आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्यास सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील. सगळी प्रार्थनास्थळं सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. पुजाऱ्यांना आतमध्ये पूजा करण्याची किंवा धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल.

Latest News