दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारकडून जबरदस्त ”अॅप लॉंच”
नवी दिल्ली – दिल्लीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांना योग्य वैदकीय सेवा उपलब्ध करून देता यावी, यासठी Delhi Corona अॅप लॉंच करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून शहरातील कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना अॅप लॉंच करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हा अॅप लॉंच करण्यात आला आहे. अपुऱ्या माहितीमुळे अनेकदा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय शोधत फिरावं लागतं. अशा अनेक तक्रारी देखील आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा, व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली असल्याचं केजरीवाल म्हणाले.दिल्लीत सध्या ४१०० खाटा रिकामी आहेत. मात्र नागरिकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे कोणत्या रुग्णालयात जावं यात त्यांचा गोंधळ उडतो. नागरिकांना कोणतीही अडचण न होता त्यांना ही माहिती देण्याचं काम हे अॅप करेल. गुगल प्ले स्टोरवरून हा अॅप डाउनलोड करता येईल. तसंच हा अॅप सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता दोनदा अपडेट केला जाईल. ज्या नागरिकांकडे स्मार्टफोन नाही, त्या व्यक्ती अॅपच्या वेब पेजवर देखील जाऊन माहिती घेऊ शकतात. शिवाय १०३१ या नंबर वर फोनकरून एसएमएसच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळवू शकतात. यासह रुग्णालयात खाटा उपलब्ध असून देखील रुग्णाला दाखल करण्यात आलं नाही. तर ती व्यक्ती १०३१ नंबरवर संपर्क साधून तक्रार दाखल करू शकते. हि तक्रार थेट आरोग्य विभागापर्यंत पोहोचणार असून नागरिकांना तात्काळ मदत केली जाईल.