चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक झाडे कोसळले

चिंचवड प्रतिनिधी : चिंचवडमधील विवेक वसाहत केशवनगर येथे वादळामुळे इनोव्हा गाडीवर भले मोठे झाड कोसळल्यामुळे मोठे नुकसान झालं आहे. शहरात 20 पेक्षा अधिक झाड उन्मळून पडली आहे. अनेक घरावरीव पत्रे उडाली आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळपासून वाऱ्याचा वेग वाढला असून शहरातील आणि उद्यानातील 20 पेक्षा झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळे अनेक वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. थेरगाव आणि इतर भागातही नुकसान झालं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नाल्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीमधील अनेक घरात पाणी शिरलं आहे. सुदैवाने आतापर्यंत कुठेही जीविहितहानी झालेली नाही. पिंपरी शहरात सोसाट्याचा वारा सुरू असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, WhatsApp वर आलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. चक्रीवादळाबाबत वेळोवेळी सरकारी यंत्रणांकडून माहिती दिली जाईल. अधिकृत न्यूज चॅनेल किंवा वेबससाइटच्या बातमीवरच विश्वास ठेवा.