मुंबई पाठोपाठ नाशिक पुणे चक्रीवादळ पावसाने जोरदार धडक

मुंबई: कोरोनाच संकटात असतानाच महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकून पुढे उत्तरमार्गे सरकलं आहे. तर ताशी १०० ते १२० किमीच्या वेगाने वारे वाहत असून काही ठिकाणी तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुडचा समुद्र प्रचंड खवळला असून रोहा, श्रीवर्धन, माणगाव, पेण आणि खोपोलीलाही बसला आहे. यामुळे घरे, झाडं, इमारतींवरील छप्परे आणि विजेचे पोल अगदी पालापाचोळ्यासारखे पडले आहेत. सध्या हे वादळ पुण्याच्या दिशेने गेल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले. रायगडमध्ये दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अलिबागमध्ये वादळ धडकल्यानंतर पुढे सरकून ते पेण, पनवेलच्या बाजूने सरकले. त्यापूर्वी दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.