उद्योगपती विजय मल्ल्या भारतात येणार

मुंबई – भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणले जाणार आहे. आता कुठल्याही क्षणी त्याला घेऊन मुंबईत विमान दाखल होण्याची शक्यता आहे. यूके येथील कोर्टाने १४ मे रोजीच त्याच्या प्रत्यार्पणावर मोहोर लावली होती. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता कोणत्याही क्षणी विजय मल्ल्याला घेऊन तपास यंत्रणा मुंबईत येऊ शकतात. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच त्याची रवानगी केली जाणार आहे. यूके येथील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. ब्रिटनच्या नियमानुसार त्या तारखेपासून २८ दिवसांच्या आत भारत सरकारने त्याला यूकेहून भारतात आणायला हवं. सध्या या निर्णयाला २० दिवस पूर्ण झाले असून त्याच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्या याच्यावर १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये मल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता.

Latest News