भारत-चीन लष्करी अधिकाऱ्यांची बैठक


नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर आज लष्करी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. भारताचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनचे मेजर जनरल लियू लिन या बैठकीला उपस्थित असणारा आहेत. नियंत्रण रेषेवरील तणाव मिटवण्यासाठी आज बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पूर्व लडाखमध्ये हा वाद सुरु आहे. लडाखने एलएससीवर रस्ता बाधंकाम करण्याचं काम सुरू केलं होतं ज्याला चीनचा विरोध आहे. भारताने आपल्या सीमेजवळील रस्त्यांसारख्या पायाभूत सविधा उभारणे बंद करावे, ही चीनची प्रमुख मागणी आहे. भारताने या भागात पक्का रस्ता तयार केल्यामुळे चीन खवळला आहे. मात्र स्वतः चिनने सात दिवसात पक्का रस्ता तयार केला आहे. भारताच्या सीमेजवळ गोगरा पोस्ट पर्यंत पोहोचणे चीनला सोपे होणार आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रा नुसार आणि संशोधनानुसार लढाखच्या पर्वतीय भागात सोन्याचे साठे आणि विपुल खनिज संपत्ती असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच चीनने भारताच्या या भागात घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सात दिवसात 4 किलोमीटर लांबीचा रस्ता बनविला आहे. तसेच दोन पूलही बांधले आहेत. कुठच्याही परिस्थितीत भारताचा हा भाग ताब्यात घ्यायचाच, या ईर्षेने चिनी सेना कारवाया करीत आहे.