हिजबुलचा ‘नाली’ ठार, आणखी चार दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आज चार ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. शोपियाँ जिल्ह्यातील पिंजोरा परिसरातील रेबन भागात आज पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम उघडली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चकमक सुरू झाली. या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले असून हिजबुल या दहशतवादी संघटनेचा मोहोरक्या ‘नाली’ ठार झाला आहे. काल देखील 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या संयुक्त पथकाकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात येते आहे.

गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात १५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यातील बहुतेक दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे होते. या पुर्वी सुरक्षा दलांनी २ जूनला त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना ठर केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ जूनला पुलवामामधील कंगन येथे ३ दहशतवादी ठार झाले. यात जैश ए मोहमदच्या कमांडरचाही समावेश होता. संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत माहिती दिली. ठार झालेल्यांमध्ये ‘हिजबूल मुजाहिद्दीन’चा कमांडर फारूक अहमद भट उर्फ नाली याचाही समावेश होता. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी कुलगाम जिल्ह्यातील येरिपोरा भागात झालेल्या चकमकीत फारुक अहमद भट निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर फारुक अहमद भट्ट याचाही समावेश आहे. फारुख अहमद भट ‘नाली’ नावानंही ओळखला जात होता. फारुख अहमद भट हा कुलगामचा रहिवासी होता. कॅटेगिरीचा दहशतवादी म्हणून ओळखला जात होता अशी माहिती समोर आली आहे.

Latest News