पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजकरण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – राजकरण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केलं आहे. अमित शहा यांनी आज व्हॅच्युअल रॅलीद्वारे पश्चिम बंगाल राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी शहांनी पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यावरून ममता त्यांच्यावर त्यांच्याच राज्यात निशाणा साधला.

”केंद्र सरकराची आयुष्यमान भारत योजना पश्चिम बंगाल राज्यात अदयाप लागू करण्यात आली नाही. इतर राज्यांत ही योजना लागू करण्यात आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी ही योजना आपल्या राज्यात लागू केलेली नाही. ममता बॅनर्जी ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु याव्यतिरिक्त राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे”, असं म्हणत शहांनी ममता यांना सुनावलं.

दरम्यान अमित शहा यांनी आज सीएए कायदा, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करत ममता बॅनर्जींना धारेवर धरलं. तसंच बंगालच्या लोकांशी संवाद साधण्यापासून ममता बॅनर्जी आम्हाला रोखू शकत नाहीत. तुम्ही रस्ते व रॅली थांबवू शकता मात्र बदल थांबवू शकत नाही. आमच्या सरकारच्या कामाचा हिशोब आम्ही देत आहोत. तुम्हीही तुमच्या १० वर्षांच्या कामाचा हिशोब द्या, असं आवाहन अमित शहांनी ममता यांना केलं आहे.

Latest News