पुणे जिल्ह्यातील 10,000 कोरोनाबाधितांचा आकडा

णे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा हा 442 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 220 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 10 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळून आले आहे. तर काल दिवसभरात पुण्यात जवळपास 12 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात 403 कोरोनाबळी गेले आहेत.

तर पुण्यात दिवसभरात 143 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 8205 रुग्ण हे एकट्या पुण्यातील आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा तब्बल 9 हजार 959 वर पोहोचला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

सुदैवाने पुण्यात दिवसभरात 119 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 5 हजार 304 वर पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या 2 हजार 498 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर 189 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. तर 37 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात आतापर्यंत तब्बल 191 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 14 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून तब्बल 263 बाधित रुग्ण बरे झाले.

दरम्यान काल ससूनमध्ये झालेल्या मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिलेचा समावेश असून ते 50 ते 75 वयोगटातील आहेत. तर डिस्चार्ज रुग्णांमध्ये 9 महिन्याच्या बालकाचा ही समावेश आहे. या बालकाला सिकलसेल ऍनिमिया हा आजार झाला होता. 26 मे रोजी या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी बालकाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं. काल ते बाळ कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Latest News