”दूरदर्शनवर” पहिली ते बारावी अभ्यासक्रमावर कार्यक्रम

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अडीच महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालयेही बंद आहेत. अर्थात शाळा कधी उघडणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आहे. मात्र लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर दूरदर्शनवरून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. आजपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

कार्यक्रमाची वेळ खालीलप्रमाणे:

  • इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी – सकाळी १०.३० ते सकाळी ११.००
  • इयत्ता सहावी ते इयत्ता नववी आणि अकरावी – सकाळी ११.०० ते दुपारी १२.००
  • इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी – सकाळी १.०० ते दुपारी २.००

दरम्यान, शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. खाली दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही पुस्तके डाऊनलोड करू शकता.

Latest News