15 जूनपासून सलून सुरू करणार- नाभिक संघा

मुंबई – आज महाराष्ट्रातील सलून आणि ब्युटी पार्लर चालक मालकांच्या तिसऱ्या महासंघाने महाराष्ट्रभर दुकानाबाहेर आंदोलन पुकारलं होतं. सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आणि घोषणा देऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी या सलून आणि ब्युटी पार्लर चालक मालकांच्या महासंघाने राज्य सरकारला इशारा दिला आहे की, पुढील पाच दिवसात सरकारने सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली नाही, तर 15 जूनला दुकानदार स्वतःचे सलून उघडतील. मग त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. एवढेच नव्हे, तर वेळ पडल्यास आम्ही “जेल भरो” आंदोलन करू असा इशारा या नाभिक संघाने दिला आहे.

सलून आणि ब्युटी पार्लर चालक-मालक महासंघाचे म्हणणे आहे की, राज्यातील 90% सलून चालकांकडे स्वतःची शेती नाही. केवळ केश कर्तनालय चालून ते आपली गुजराण करतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून सलून आणि ब्युटीपार्लर बंद असल्यामुळे हजारो कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल झाले आहेत. अशा वेळी सरकारने त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा 15 जून पासून आम्ही सलून उघडणार. मग वाटल्यास सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करू दे, आम्ही आमच्या अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहोत. तर वेळ पडल्यास जेलभरो आंदोलनही करू, असा आक्रमक इशारा नाभिक संघटनेचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि दत्ता अनारसे यांनी दिली आहे.

यापूर्वी 6 जूनला रवी बेलपत्रे आणि सोमनाथ काशीद पदाधिकारी असलेल्या संघटनेने नाभिक संघटनेने सरकार विरोधी आंदोलन केले होते. त्यानंतर कल्याण दळे अध्यक्ष असलेल्या नाभिक महासंघाने धोपटी व अर्ध नग्न आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला ट्विटरद्वारे विनंती केली आहे की, लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाचे प्रचंड हाल झाले असून त्यांना सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे आता राज्य सरकार काऊ भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Latest News