सिंहगडावर दरड कोसळली- आदेशानुसार रस्ता बंद

सिंहगड – पावसाळा जोरदार सुरू होण्यापूर्वीच सिंहगडावर दरडी कोसळू लागल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने रविवारी (दि.7) गडावरील पार्किंग ते पुणे दरवाजा या पायवाटेवर दरड कोसळल्यानंतर यातील मोठे दगड हटविण्याचे काम वन विभागातर्फे सुरू आहे.

सिंहगड पर्यटकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आला असून घाट रस्त्यावरील वाहतूकही पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर तसेच गडावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. परंतु, सध्या पावसाला जोर नसतानाही दरड कोसळू लागल्या आहेत. माती वाहून गेल्याने रस्ते खचले आहेत काही वळणावरच लहान-मोठे दगड कोसळले आहेत. सिंहगड घाट रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून काही ठिकाणी जाळ्या बसविल्या. परंतु, त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Latest News