पुण्यातील सिलिंडर बुक करण्यासाठी लिंक पाठवून त्याद्वारे 1 लाख 4 हजार 500 रुपयांचा गंडा.

 पुणे: गॅस सिलिंडर बुक करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिलिंडर बुक करण्यासाठी लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख ४ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. खराडी, चंदननगर भागात हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला.

याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी गॅस बुक करण्यासाठी गॅस एजन्सीचा नंबर गुगलवर सर्च केला. त्या वेळी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने ऑनलाइन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी एक लिंक पाठविली. यावर आवश्यक ती माहिती भरण्यासाठी सांगितले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून सुरुवातीच्या काळात साडेचार हजार रुपये यूपीआयच्या माध्यमातून ट्रान्सफर झाले.

ही रक्कम काढली गेल्यानंतर ११ जूनला तक्रारदार यांच्या ‘एसबीआय’च्या खत्यामधून अचानक ९९ हजार ९०० रुपये ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा मेसेज तक्रारदार यांना आला, अशी माहिती पोलिसांनी दिेली. त्यानंतर तक्रारदार यांनी तातडीने चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके पुढील तपास करीत आहेत.

Latest News