चेंबूर येथील:नगरसेवकाच्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

मुंबई – चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग क्रमांक १५५ चे शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. अभिषेक शेट्ये (२५) असं त्याचं नाव असून रविवारी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिषेक चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत रहात होता. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. काही कामानिमित्त त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. खोलीत कोणी नाही पाहून त्याने आत्महत्या केली. प्रकरण उघडकीस येताच त्याला तत्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Latest News