”ताब्यात घेतलेल्या 2 अधिकाऱ्यांना पाकिस्तानाने सोडले”


इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तांचे दोन अधिकाऱ्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यांना सोडण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना भारतीयांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकार?
इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात काम करणारे दोन भारतीय अधिकारी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हाय-कमिशनकडे जाण्यासाठी त्यांच्या वाहनाने निघाले होते. परंतु ते उच्चायुक्तालयात पोहोचले नाहीत. भारतीय विदेश मंत्रालयाने यासाठी पाकिस्तानचे कार्यकारी उच्चायुक्त यांना याबाबत महिती दिली होती. त्यानंतर कथित हिट अँड रन प्रकरणात या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली.
भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न
यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्दीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आयएसआयच्या काही एजंटनी भारतीय मुत्सद्दीचा पाठलाग केल्याचे वृत्त आहे. भारतीय मुत्सद्दीसोबत झालेल्या या घटनेनंतर भारताने तीव्र विरोध व्यक्त केला.