देशात मागील २४ तासात तब्बल ३८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू

मुंबई: देशात मागील २४ तासात तब्बल ३८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. मागील २४ तासात देशात तब्बल १०,६६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत ९९०० जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात गेल्या २४ तासात तब्बल १०,६६७ नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ३ लाख ४३ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ३,४३,०९१ रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी ९९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे

सध्या रुग्णांचा आकडा हा वाढतानाच दिसतो आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत १,८०,०१३ जण बरेही झाले आहेत. सध्या १,५३,१७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात गेल्या २४ तासात २७८६ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,१०,७४४ एवढी झाली आहे. काल ५०७१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५६०४९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५०५५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासात राज्यात १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ४१२८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु झाला आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Latest News