‘माजी खासदार हरिभाऊ जावळे” बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मुंबई : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती.गेल्या काही दिवसांपासून हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. उपचारासाठी त्यांना जळगाववरुन मुंबईला हलवलं होतं. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसंच  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे.भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.

भाजपने हरिभाऊ जावळे यांच्याकडे  जळगाव जिल्हाध्यक्षपद  सोपवलं होते. जळगाव जिल्हाध्यक्ष निवडताना मोठा राडा झाला होता. धक्काबुक्की, शाईफेक आणि राडेबाजीनंतर जळगाव जिल्ह्याचा भाजप अध्यक्ष ठरला होता. माजी आमदार आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची ‘एकमताने’ निवड करण्यात आल्याची घोषणा,  भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती.

Latest News