चीनच्या हल्ल्यानंतर ”दिल्लीतील हालचालींना वेग”

नवी दिल्ली – चीनने केलेल्या हल्ल्यात एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, वायू सेना, लष्कर आणि नौदल प्रमुख यांच्यासोबत ही बैठक पार पडली.

संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत पार पडलेल्या या बैठकीत काल रात्री नेमकं काय घडलं? याचा आढावा घेण्यात आला. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले. चीन आणि भारत यांच्या झालेल्या झटापटीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तर तणाव आणखी वाढू नये, यासाठी दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी आपापसांत चर्चा करत असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून मिळाली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर राजनाथ सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेणार आहेत.

Latest News