पुण्यातील सहा मीटर रूंद रस्ते नऊ मीटर करण्याचा महापालिकेचा निर्णय राज्य सरकारने फिरवला


पुणे : पुण्यातील सहा मीटर रूंद रस्ते नऊ मीटर करण्याचा महापालिकेचा निर्णय राज्य सरकारने फिरवला आहे. त्याचवेळी शहरातील सहा मीटर रस्त्यांलगत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकास करताना ‘टीडीआर’ वापरण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेली बंदीही उठविण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मध्यवर्ती पुण्यात मोठ्या प्रमाणात घरे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना धबीपछाड मानला जातो.
दरम्यान, उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शुभारंभ करण्यात आला. फडणवीस सरकारच्या काळातही मॅग्नेटीक महाराष्ट्र असा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी कोट्यवधीची गुंतवणूक करण्यात आली होती, असा दावा करण्यात आला होता.
पंरतु, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यावेळी अशा अनेक कंपन्या समोर आल्या होत्या. पण, त्यानंतर कोणत्याही कंपनीने गुंतवणूक केली नाही. त्यामुळे याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती दिली.
फडणवीस सरकारच्या काळात मेक इन इंडिया आणि मॅग्नेटीक महाराष्ट्र असा मिळून संयुक्त कार्यक्रम घेण्यात आाला होता. त्यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत जे काही करार झाले होते, त्या कराराचा फेरआढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.
फडणवीस सरकारच्या काळात जे करार झाले होते ते औद्योगिक मेळावे, परिषद आणि मोठ्या कार्यक्रमात झाले होते. त्यावेळी अशी परिस्थिती होती की, कंपन्या या समोर येतात आणि कंपन्या स्थापन करण्यासाठी करार करण्याची माहिती देतात. त्यामुळे ती कंपनी नेमकी कोणती, काय करणार आहे याची छानणी करण्यास वेळ मिळत नाही.
तसंच समोरून येणाऱ्या कंपन्यांवर गैरविश्वासही दाखवता येत नाही. पण त्यानंतर झाले असे की, त्या करारांची पूर्तता होत नाही, अशी बाबसमोर आली. काही उद्योग स्थापन झाले, काही झाले नाही. काही कंपन्या या मंदीमध्ये अडकल्या त्यामुळे त्या पुढे आल्याच नाही, अशी माहितीही देसाईंनी दिली.