चिनला जशास तसे उत्तर द्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

  • भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात आलेलं वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी धाडस आणि शौर्य दाखवत देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. देशाने त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
  • चीनचा कमांडिंग ऑफिसरही संघर्षात ठार, ANI चे सूत्रांच्या हवाल्याने वृत्त, किमान 40 चिनी सैनिक ठार झाल्याचं वृत्त
  • गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये चीनलाही भारतीय जवानांनी मोठा दणका दिल्याचं वृत्त आहे. सीमेजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, स्ट्रेचरवरुन जखमी आणि मृत चिनी सैनिक नेण्यात आले. चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र चीनने आपल्यावतीने याची पुष्टी केलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतापुढे आता कोणते मार्ग असतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

15 आणि 16 जूनच्या रात्री धुमश्चक्री

भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off 20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.

‘गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं’, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

Latest News