मुंबई शेअर बाजारात चढ-उतार ”भारत-चीन तणावामुळे”

OLYMPUS DIGITAL CAMERA

OLYMPUS DIGITAL CAMERA

मुंबई – भारत आणि चीनच्या सीमेवर सुरू असलेली चकमक आणि तणावामुळे आज मायनसमध्ये ओपन झालेल्या मुंबई शेअर बाजारात नंतर सुधारणा होऊन तो प्लस झाला. आज सकाळी निफ्टी ९,९००च्या जवळ उघडला होता. त्यावेळी बाजारात विक्रीचा दबाव होता. मात्र नंतर खरेदीचा जोर वाढल्याने निर्देशांकात ३६ अंकांची तर निफ्टीत ११ अंकाची वाढ झाली होती. येस बँक आणि एचपीसीएल आज फोकसमध्ये होते.

आज सकाळी कमजोर उघडलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात २६५ अंकांची घसरण झाली होती. नंतर बाजार सावरला परंतु काही वेळातच पुन्हा घसरण झाली. त्यामुळे आज बाजारात चढ-उतार सतत सुरू होते. मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, झी एन्टरटेन, विप्रो आणि ब्रिटानिया यांचे समभाग आज तेजीत होते, तर भारती इन्फ्राटेल, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, महिंद्रा आणि महिंद्रा व गेल या कंपन्यांच्या समभागांत घसरण झाली होती.

Latest News