चीनच्या सैन्य दलातही मोठी जिवीतहानी झाल्याचे स्पष्ट…

नवी दिल्ली –  पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावात भारत आणि चीन या दोन्ही बाजूला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. गलावाण खोर-यात झालेल्या संघर्षात ेभारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनच्या सैन्य दलातील 35 जवान देखील मारले गेले असून यात एका वरिष्ठ अधिका-याचा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून ही माहिती मिळाली आहे.

अमेरिकेन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने यूएस न्यूज वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तसंच या हल्ल्यात आपले इतके सैनिक मारले गेलेे आहेत हे चीन मान्य करणार नाही, असंही अमेरिकेच्या विश्लेषणानुसार समोर आलं आहे. दरम्यान, हल्ला झालेल्या ठिकाणी मंगळवारी रात्री हेलिकाॅप्टरच्या  फे-या अधिक वाढल्या होत्या. त्यामुळे चीनच्या सैन्य दलातही मोठी जिवीतहानी झाल्याचे स्पष्ट होत आहे.