राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा

One of the HSC exam centre in Bhave School Sadashiv Peth on the first day of the exams. Express Photo by Sandip Daundkar,21.02.2018, Pune

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरसमुळे स्थगित केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार आहे. एमपीएससीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केलं होतं. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांचं काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी जोर धरत होती. तसेच मागणीचा पाठपुरावा करण्यात येत होता. एमपीएससीनं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं असलं तरी सोशल डिस्टंसिंग हे मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एमपीएससीने याबाबत खुलासा केलेला नाही. पण कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असं परिपत्रकांत आयोगानं स्पष्ट केलं आहे.

Latest News