चीनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्य तैनात

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये १५ -१६ जूनच्या रात्री घडलेल्या घातपातामुळे भारतीय सैन्य अधिक सज्ज झालं आहे. चीनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आली आहे. भारताने नेहमीच शांततेची भूमिका घेतली आहे. मात्र भारताच्या भूभागावर चीनने केलेला दावा खोडून काढण्यासाठी भारतीय सैन्याचे शांततेचे धोरण आता बदलत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्त संकेतस्थळाला सांगितले.

पिपल्स लिबरेशन आर्मी भारतीय भूभागापर्यंत चालत येत होती, मात्र हे दिवस संपले आहेत आता. तसेच, प्रत्यक्ष नियंत्र रेषा म्हणजेच ३४८८ किमीच्या एलएसीवर भारतीय सैन्य आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हाय अलर्टवर आहे. गलवान खोऱ्यापासून ते सर्व वादग्रस्त जागांवर तैनाती वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे चीननेही सैन्य वाढवलं आहे. गलवान खोरे, दौलत बेग ओल्डी, डेप्सांग, चुशुल आणि पूर्व लडाखसारख्या भागात चीनने सैन्य वाढवलं आहे.

Latest News