मान्सूनपुर्व पुरनियंत्रण् प्रभाग दौ-यात पदाधिका-यांकडून नाल्यांची पाहणी

मान्सूनपुर्व पुरनियंत्रण् प्रभाग दौ-यात पदाधिका-यांकडून नाल्यांची पाहणी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात तीन दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण् प्रभाग दौ-याच्या दुसऱ्या दिवशाची सुरुवात आज दिनांक १८ रोजी सकाळी ०७.३० वा. पासुन म्हसोबा मंदिर लांडेवाडी नाला येथून झाली. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, हर्षल ढोरे, तुषार कामठे, सागर अंघोळकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका आशा शेंडगे, शारदा सोनवणे, आरती चोंधे, उषा मुंढे, माधवी राजापुरे, सिमा चौघुले, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, ह क्षेत्रीय अधिकारी संदिप खोत, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या तीन दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण प्रभाग दौ-यात आज दुसऱ्या दिवशी ड, व ह या प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. तसेच उद्या उर्वरित प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात येणार आहे.
पाहणी दौऱ्यामध्ये ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत म्हसोबा मंदिर लांडेवाडी नाला, महात्मा फुलेनगर, शंकर मंदिर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव-६० फुटी रोड स्मार्ट सिटी, पिंपळे सौदागर – दत्त मंदिर, पिपंळे निलख- शिक्षक कॉलनी, गावठाण, वाकड गावठाण सायकर चाळ- सुर्या हॉस्पिटल या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी आज करण्यात आली.