पिंपरी कॅम्पमधील वसाहतींचे विस्तृत सर्वेक्षण करण्याचे आदेश : आमदार ॲड. चाबुकस्वार

पिंपरी कॅम्पमधील वसाहतींचे विस्तृत सर्वेक्षण करण्याचे आदेश : आमदार ॲड. चाबुकस्वार
पिंपरी (3 फेब्रुवारी 19) : पिंपरी कॅम्पमधील निर्वासितांच्या वसाहतींचे विस्तृत सर्वेक्षण आगामी एक महिन्यात पुणे जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली करून त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवावा. असे आदेश महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी या जागेवर असणा-या सुमारे साडेतीन हजार मिळकतींचे पूर्ण सर्वेक्षण नगर भूमापन अधिकारी व महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी खासगी संस्थेकडून करून घ्यावे. असा निर्णय पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत दिला. याबाबत मागील आठवड्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
या वेळी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, अप्पर तहसिलदार गीतांजली शिर्के, कुळ कायदा तहसिलदार प्रशांत आवटे, नगर भूमापन अधिकारी शिवाजी भोसले, सिटी सर्वेक्षण अधिकारी आप्पासाहेब चिखलगी, रहिवासी प्रतिनिधी हरेश बोधानी, किशोर केसवानी, महेश वाधवानी आदी उपस्थित होते.