‘नापास’ विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणजे भाजप सरकार – अनंत गाडगीळ

मुंबई | अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची असून त्या या परीक्षेत नापास झाल्याचं सिद्ध झालं आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप सरकारला लगावलाय. संघाच्या ‘वर्गात’ वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी ‘नीट’ तयारी करावी, असं म्हणत गाडगीळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजप सरकार म्हणजे ‘नापास’ विद्यार्थ्यांचा ‘वर्ग’ झाला आहे, असं अनंत गाडगीळ यांनी म्हटलंय.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला 80 हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत, असंही गाडगीळ म्हणालेत.