रेशनिंगचा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी समोर आणला

ration-kala-bazar
नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने 270 मेट्रीक टन तांदूळ जप्त केला

नवी मुंबई : सर्वसामान्य गोरगरिबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. कोव्हिड काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणारे रेशनिगचे तांदूळ त्यांना न मिळता विविध साऊथ आफ्रिकन देशात निर्यात होत असल्याचे समोर आले आहे.

हा सर्व रेशनिगचा तांदूळ कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून आणण्यात आला होता. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने 270 मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यात 32 हजार 827 मेट्रीक टन तांदूळ या साऊथ आफ्रीकन देशात निर्यात केला आहे. त्याची किंमत 80 कोटींच्या घरात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपी असून कर्नाटकमधून तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

सरकार गरिबांसाठी पाठवत असलेले तांदूळ ही टोळी रेशनिंगचा दुकानातून मिळवत असे. कोरोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केली. तसेच कोरोना काळात जास्त तांदूळही वाटण्यासाठी पाठवण्यात आला होत. हा सर्व तांदूळ काळाबाजार करून महाराष्ट्रातील गोडाऊनमध्ये आणला जात होता. त्यानंतर दुसऱ्या गोणीमध्ये भरून तो आफ्रिकन देशात निर्यात केला जात होता.

नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टीकमधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फुड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूरमधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनीतून तब्बल 91 लाख 12 हजार 046 रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे.

Latest News