मोदी बाबू GDP बेकाबू! – खासदार नुसरत जहाँ


नवी दिल्ली | भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून दरम्यान तब्बल 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनीही जीडीपीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात नुसरत जहाँ यांनी एक ट्विट केलं आहे. मोदी बाबू GDP बेकाबू! आता ना पबजी गेममध्ये रीवाईवलर होणार आहे ना अर्थव्यवस्थेत, मोदीजी आता आम्ही करायचं तरी काय?, असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने पबजी गेमसह 118 अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याचाच धागा पकडत नुसरत जहाँ यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. त्यासोबतच जीडीपीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनीही मोदींवर टीका केलीये.