लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा- नाना पटोले

nana-patole-s-a

यवतमाळ | राज्यावर कोरोनाचं संकट आहे. मात्र लोकांच्या मनात कोरोनाबाबच जी भिती आहे ती कमी करा, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. जिल्हाधिकारी कार्यालयात करोनासंदर्भात प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, कोरोनाच संकट हे एका युद्धासारखं आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करायचा असेल तर आधी लोकांच्या मनात कोरोनाबाबत असलेली भीती पूर्णपणे नष्ट करा.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यू नव्हता. मात्र आता यवतमाळचा मृत्यूदर आज 3.1 टक्के आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Latest News