महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?

मुंबई- देशभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप देखील झाले. मात्र सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा एम्सचा अहवाल समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदमानी केली जात असल्याचं वारंवार राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत होते ज्याला एम्सच्या अहवालाने बळ मिळाले आहे. दरम्यान, बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या राज्याचे भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तसेच, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि भाजपप्रणित आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळविण्यासाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

Latest News