पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात मी सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी …


मुंबई | गेल्या 50 वर्षापासून देशासह राज्याचे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात मी सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली उतरुन मतरदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुसते सल्ले देत बसू नये, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना रस्त्याच्या दुरवस्थेवरुन त्यांनी रोहित यांच्यावर निशाणा साधत त्यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
येत्या काही दिवसात तुम्ही कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते लवकरात-लवकर दुरुस्त करावे आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो. असंही ते म्हणाले आहेत.