ग्रंथालयं, मेट्रो सेवा उद्यापासून होणार सुरू

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येतंय. तर आता मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवं परिपत्रक जारी केलंय. या परिपत्रकाप्रमाणे उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व ग्रंथालयं आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीये. दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नाहीये. मात्र, शाळेतील शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आलीये.

Latest News