पुण्यात 13दिवसांच्या मुलाला आई बापानेच पुरले

पुणे – सिंहगड रस्ता परिसरात एक 13 दिवसाच्या मुलाचा मृतदेह खड्‌डयात गाडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधीत मुलाच्या पालकांची चौकशी सुरु आहे. हा मुलगा दिव्यांग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील गोदावरी हॉस्टेलच्या पाठिमागे मुलाला खड्डा खणून गाडण्यात आले होते. पोलिसांना एका खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

‘मुलाच्या आई-वडिलांचा विवाह एका मंदिरात झाला होता. ते दोघेही गरीब कुटूंबातले असल्याने दिव्यांग मुलाला संभाळू शकत नव्हते. यामुळे त्यांनी त्याला दत्तक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा स्विकार करण्यास कोणीही पुढे आहे नव्हते. दरम्यान संबंधीत मुलाला खड्ड्यात गाडले असल्याची माहिती बातमीदारांमार्फत मिळाली

तहसिलदारांच्या परवानगीनंतर खड्डा खणण्यात आला. हा 13 दिवसांचा मुलगा दिव्यांग असल्याने त्याच्या पालकांनी त्याला दत्तक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला कोणही दत्तक घेत नसल्याने त्यांनी त्याला खड्डा खणून गाडले. त्याला मृत झाल्यावर गाडण्यात आले का गाडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा अंदाज नंदकुमार शेळके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस स्टेशन यांनी व्यक्त केला आहे

Latest News