पुणे विद्यापीठावर खर्च टाकण्याच्या शासनाच्या निर्णयावरही अधिसभा सदस्यांतून तीव्र नाराजी…

पुणे – पुणे विद्यापीठावर खर्च टाकण्याच्या शासनाच्या निर्णयावरही अधिसभा सदस्यांतून तीव्र नाराजी दर्शविली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन दिवसीय अधिसभेचा रविवारी समारोप झाला. विद्यापीठ कायदा सुधारणा संदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या समितीत राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे. या समितीच्या बैठकांसाठी येणारा सर्व खर्च पुणे विद्यापीठाकडून केला जात आहे. या समितीत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंचा समावेश नसणे आणि हा खर्च पुणे विद्यापीठावर टाकण्याबाबत राज्य शासनाचा तीव्र निषेध करावा, असा ठराव करण्याची मागणी काही सदस्यांनी अधिसभेत केली. समितीत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा समावेश नसणे खेदजनक आहे. याबाबतची अधिसभा सदस्यांची नाराजी विद्यापीठाने राज्य शासनापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी गिरीश भवाळकर, राजीव साबडे, डॉ. शामकांत देशमुख, दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे आदींनी केली. ‘विद्यापीठ कायद्यातील सुधारणांबाबत नेमलेल्या या समितीचा खर्च पुणे विद्यापीठावर का टाकण्यात आला? याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे